जागतिक कोड दिन विशेष : पांढऱ्या डागांबद्दल गैरसमजच अधिक


DNA Live24 । डॉ. संजय सोनवणे - आयुष्याच्या वाटचालीत रंगाचा आणि आपला पावालोगणित सबंध येतोच. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये विविध रंगाच्या छटा उसळतात. काही जाणवतात, तर काही अनुभवावे लागते. पण त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत राहतेच. तरुणपणी प्रेमात पडल्यावर गुलाबी रंग, लहानपणी अभ्यास न् केल्याबद्दल गुरुजींनी गालावर उमठवलेल्या पाच बोटांचा लाल रंग, इच्छित हट्ट वडिलांनी पुरवल्यानंतर फुलणारे चेहऱ्यावरील हास्याचे रंग, इत्यादि. खरंच रंगांनी किती आयुष्य व्यापलेले आहे आपले. रंगाशिवाय आयुष्य खरंच बेरंगच होऊन जाते.

जेव्हा आयुष्यातील रंग निघून जातो, त्यावेळी मनुष्य मानसिक दुष्ट्या कित्ती हतबल होतो नाही का ? आज आपण अशाच एका शाररिक आजाराबद्दल चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये शरीरात असणारी रंगद्रव्ये हळू हळू कमी होत जातात आणि त्यामध्ये पांढरेपणा दिसू लागतो.  होय ! मी पांढरे दाग, कोड, leucoderma, vitiligo विषयीच बोलत आहे. गोऱ्या रंगाचे आकर्षण तर सर्वांनाच असते, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरा दाग दिसू लागतो, त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो. 

मित्रांनो प्रत्येक माणसात काही ना काही व्यंग, कमतरता असतेच. काही दिसतात तर काही दिसत नाहीत, एवढेच. पण त्यामुळे अशा व्यक्तींना जमले तर सहकार्य करा. त्यांचे वैगुण्य दाखवुन त्यांना दुखवू नका. जागतिक vitiligo Research Foundation समितीने कोडविषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणुन पाळावयाचे ठरवले. या दिवशी विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती पर योजना कार्यक्रम राबवतात.

कोड. पांढरे दाग. leucoderma, vitiigo या नावाने वैद्यकीय शास्त्रात संबोधले जाते, तसा हा काही मोठ्ठा शाररिक आजार नाही. पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे. विशेषतः मुलींमध्ये, उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा विवाह जुळण्यास फार मोठ्ठी आडचण आहे. त्याशिवाय ज्या व्यक्तीना पांढरे दाग, कोड या आजाराने त्रास आहेत, त्या समाजापासून दूर उपेक्षित राहतात. हे लोक एकलकोंडेपना, शापित आयुष्य व्यतीत करतात. कोडावर, पांढरे डागांवर कुठलेही औषधी नाही, हा दैवी कोप आहे वगैरे समजुतीही रूढ आहेत.

पांढरे दाग, कोड .Leucoderma, Vitiligo म्हणजे काय ? - तो कसा होतो, अनुवांशिक आहे का ? यावर उपचार करायला हवेत इतके गंभीर आजार आहे का ? या आणि आशा अनेक नानाविध प्रश्नांनी रुग्न गोंधळला जातो. काय करावे आणि काय नाही ? कळत नाही. अनेक उपचार करून ही फरक न झाल्यामुळे आगदी सुशिक्षीत रुग्ण सुद्धा अंधश्रधेला बळी पडतात. आणि शेवटी निराशाच वाट्याला येते. या सर्व प्रश्नांची उक्कल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

लेखाचा हेतू - हा लेख तुम्हा;ला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल. तसेच रुग्णांवर सहज सुरक्षित आणि परिणामकारक इलाज कसे होऊ शकतील. हे आपणास सांगेल. इतकच नाही तर याचा हेतू आहे रुग्णांना निरोगी कार्यशील जीवन जगता येणे शक्य आहे, असा विश्वास देण्याचा. तुम्ही पांढरे डागांवर सहज विजय मिळवू शकता, तुम्हाला वाटते त्याहूनही अधिक ते सोप्पे आहे ते. टीप - सकारात्मक विचार करा, पण त्याच बरोबर पांढरे दाग हा गंभीर आजार आहे. याचीही जाणीव ठेवा, त्यावर उपचार केलेच नाही किव्हा केलेले उपचार योग्य नसतील तर ते धोकादायक ठरू शकतो.

कोडविषयी समज - गैरसमज -  वैद्यकीयदृष्ट्या कोड हा काही आजार नाही. कारण यापासून कुठलाही त्रास होत नाही किंवा जीवितालाही काही धोका नाही. तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे. पांढरे दाग असलेल्या मुला-मुलींचे लग्न होणे, किती अवघड होते, हे त्या कुटुंबालाच ज्ञात असते. त्या कुटुंबावर कलंक लावला जातो. समाजात त्यांची अवहेलना केली जाते. ज्या व्यक्तीला आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला, या न्युनगंडात तों वावरतो. मात्र, सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले, तर समाज त्यांना मानवंदना देतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. उदा. मायकल जॅक्सन, भारताचा विख्यात क्रिकेटपट्टू एकनाथ सोनकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला.

भारतीय समाजात अनेक गैरसमजुती आहेत. समाजातील काही भोंदू बाबा, मंत्रीक तांत्रिक कोड असलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांना याबाबद वाट्टेल ते सांगतात, अनेक धार्मिक विधी, उपवास, व्रत वैकल्ये, मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीमुळे कोड बरा होईल असा सल्लाही देतात. त्यासाठी प्रचंड पैसा उकळतात. काही झाडपाल्यावाले वैदू, तुमडी, जळवा आदी अघोरी उपचार करतात. तर काही झाडपाल्याची औषधी देतात. याचाही काहीही उपयोग होत नाही. कोडवर योग्य वैद्यकीय उपचार करून घेणेच योग्य आहे,

कोड असलेली मुलगी कुटुंबाला शाप ? असा आक्रोश करूनही काही उपयोग नाही, मांत्रिक तांत्रिककडे जाऊनही काही उपयोग नाही. ज्यांना कोड आहे, त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. या आजाराने शाररिक, बौद्धिक, मानसिक क्षमतेवर कुठलेही परिणाम होत नाहीत. त्यांची बुद्धिमत्ता अन्य व्यक्तीप्रमानेच असते. भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे, हा गैरसमज आहे.  कोड असलेल्या व्यक्तींनी समाजात अनेक उतुंग यशाची शिखरे गाठली आहेत .हे लक्षात घेऊन आपण कोडची कीड दूर करूया. 

कोड म्हणजे काय ? - त्वचेवर बऱ्याच प्रकारचे पांढरट किंवा पांढरे दाग येतात. सर्व पांढरे दाग म्हणजे कोड अथवा पांढरे दाग असू शकत नाहीत. बऱ्याच वेळा अनेक आजारामध्ये जसे की पितीरीयासीस अल्बा ( pitiriasis Alba ) पोस्ट इंफ्लामेटरी (post inflamatory ) हय्पोपिग्मेंतातैओन ( hypopigmentation ), ईदिओ पथिक हायपो पिग्मेंतातीओन ( Idiopathic Hypopigmentation ) भाजल्या नंतर जन्मजात, नँवस, पांढरे दाग यात समाविष्ट होतात. पांढरे दाग आहेत की बाकी काही याचे निदान तज्ञ डॉक्टरकडूनच करून घ्यावे. 

अगदी सोप्प्या भाषेत सांगायचे तर शरीरात असणारा रंग कमी झाल्याने त्वचा पांढरी दिसू लागते, यालाच पांढरे दाग म्हणतात. त्वचेत असणारया मेलानीन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणामुळे शरीरास काळा, सावळा. निम गोरा, गोरा रंग येतो. तो रंग तयार करणाऱ्या पेशी ज्यावेळी अकार्याक्षम होतात, व्यवस्तीत कार्य करत नाहीत, अथवा नष्ट होऊ लागतात, त्यावेळी त्वचा पांढरट होते आणि पांढरे दाग दिसू लागतात.

पांढऱ्या डागांचे विशेषतः प्रमाणानुसार चार प्रकार पडतात - 

१) लोकालईझड - यामध्ये एकाच ठिकाणी दाग येतात आणि स्थिर असतात.
२) सेग मेंटल - एका पट्ट्या मध्येच येतात. दोन्ही बाजुं सारखेच असतात.
३) अक्रोफेसिअल - यामध्ये शरीराच्या टोकाच्या भागाकडे हे दाग असतात. म्हणजे हाताच्या बोटांकडे, ओठांवर, तळहात, तळपाय. 
४) जनरल - पूर्ण शरीरावर असतात. 

कोडचे कारण - एखाद्याला कोड का होतो, हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. कोडमध्ये जंतू विषाणू नसतात. कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो, हा काही दैव दैवतांचा शाप नाही की भूतबाधाही नाही. याला शास्त्रीय कारण एवढेच सांगता येईल, की मेलानीन हा रंग तयार करणाऱ्या मेलानोसाईट पेशींच्या विरोधात एँनटी मेलानोसाईट प्रतीद्रव्ये तयार होतात आणि ही प्रतिद्रव्ये मेलानीन निष्क्रीय करतात. व मेलानीन तयार होत नाही. ही प्रतिद्रव्ये का तयार होतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्याविषयी जगभरात संशोधन चालू आहे.

आपल्याच शरीरातील काही पेशी आपलीच ओळख विसरतात आणि अनोळखी पेशींना नष्ट करण्याची प्रक्रिया चालू होते. तेथूनच हा आजार बळावतो. गेल्या १४ वर्षांपासून मी या विषयावर अभ्यास करत आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अनुभवातून समोर येत आहेत.

कोडावरील उपचाराचे यश अपयश
१) एकाच घरात दोन पेक्षा जास्त व्याकीनांना ही बाधा आसेल तर वेळ लागतो.
२) बऱ्याच वर्षांपासून जुनाट झालेल्या आजाराला वेळ लागतो.
३) पांढरे डागांवर काळे केस असल्यास लवकर फरक पडतो.
४) अंगावर जास्त प्रमाणात असल्यास वेळ लागतो.
५) वयाच्या ४० वर्षांनतर उशिरा फरक पडतो.
६) उपचारासाठी काही महिने वर्ष कालावधी जातो. त्यामुळे रुग्णांसह डॉक्टरांनीही संयम पाळणे गरजेचे. 

अधिक माहितीसाठी आपण आकाशवाणी वरील हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम ऐकावा.

सामाजिक उपक्रम -  अशा रुग्णांना उपचार सोबतच योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, तसेच सल्ला, उपचार मिळणे आवश्यक आहे. आम्ही कै. शंकरराव पाटील सोनवणे वैद्यकीय सामाजिक प्रतिष्ठान व आनंद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने सुंदर मी होणार ही माहिती पूर्ण चित्रफीत २००३ साली प्रकाशित केली आहे. तसेच इंटरनेटवर सुंदर मी होणार हे पेज तयार केले आहे.

याशिवाय क्युअर ल्युकोडर्मा व डाॅ. संजय सोनवणे यांचा ब्लॉग या संकेतस्थळांवर विस्तृत माहिती दिली आहे.

कौतुक - डॉक्टर संजय सोनवणे यांचे या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची दिल्लीत चिकित्सक रत्न या पुरस्कारासाठी निवड २००४ साली झाली. तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने २४ फेब्रुवारी २००५ रोजी राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच प्रमाणे १७ सप्टेंबर २००६ रोजी शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ अहमदनगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. युवा शक्ती सामाजिक संस्था नासिक, यांचे वतीने २० में २००८ रोजी , उपजिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार अनिल ढिकले, आदिंच्या उपस्थितीत नासिक येथे समाज प्रबोधन २००८ पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर. यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर. आर. पाटील साहेब यांचे हस्ते कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांचे हस्ते संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला. त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा. राम शिंदे यांचे अध्यक्षतेखाली, विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ).  विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ), पी. ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ. महाराष्ट्र ) , संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.

डॉ. संजय सोनवणे यांच्याशी संपर्कासाठी - 

2) पत्ता - आनंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोडेगाव, ता. नेवासे, जि. अहमदनगर
3) फोन नं. 98 22 287 376