सावधान ! सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय


अहमदनगर । DNA Live24 - शहरात दिवसातून दोन ते तीन सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी पोलिसांकडे येतात. कितीतरी तक्रारी लोक दाखलच करत नाहीत. यावरुन सायबर गुन्हेगारी किती वाढली आहे, याचा प्रत्यय येतो. सोशल मिडियाचा वाढता वापर व ई- बँिकंगच्या जगात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे, ही खुप महत्वाची बाब आहे, असे प्रतिपादन सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांची केले.

येथील न्यु आर्टस महाविद्यालयातील बीसीए (विज्ञान ) विभागाच्या वतीने आयोजीत सायबर सुरक्षेबाबत मार्गदरशन कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे हे होते. यावेळी सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षक किर्ती पाटील, विभागप्रमुख अरूण गांगर्डे, प्रा. एम. एस. कस्तुरे, प्रा. एस. एस. निंबाळकर, प्रा. एस. व्ही. इंगळे, उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक पवार म्हणाले, सायबर मिडियाचा वापर करताना युवती व महिलांनी विषेश काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून अथवा खाते हॅक करून त्यांना त्रास देणे, बदनामी करणे यांसारख्या प्रकारचे गुन्हे वाढीस लागले अहेत. यामुळे युवती व महिलांनी सेटिंग्ज मध्ये पाहुन सुरक्षा सेटिंग्ज केल्या पाहिजेत. एटीएम, डेबिट कार्ड, व इंटरनेट बँकिंगचा वापर करणाऱ्यांनी दुसऱ्यांना कोणतीही माहिती देऊ नये. अशी माहिती मिळवुन भामटे ऑनलाईन फसवणुक करण्याचे प्रमाण वाढले आहे.

एकट्या पुण्यात गेल्या वर्षी ऑनलाईन फसवणुकीतून चाळीस कोटी रूपये सायबर गुन्हेगारांनी हडप केल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारांनीही सावध राहावे, कारण अशा पध्दतीने गुन्हे करणारे शंभर टक्के पकडले जातात. या वेळी प्राचार्य झावरे यांनी सायबर सुरक्षितते बद्दल कोणती दक्षता घ्यायची, याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरूण गांगर्डे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिपाली जगदाळे यांनी केले. अाभार प्रा. प्रविण कुलकर्णी यांनी मानले.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.