कुख्यात गुंड प्रदीप सरोदे अखेर गजाआड!


नगर : DNALive24-
राहाता, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूरसह शिर्डी परिसरात खून, दरोडे, रस्तालूट करत दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंड प्रदीप सुनील सरोदे (वय ३२, रा. वाघवस्ती, शिर्डी, ता. राहाता) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस प्रदीपच्या मागावर होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रदीप व त्याचे साथीदार हे १५ मे रोजी नगर ते राहुरी रस्त्यावर विद्यापीठाच्या दिशेने रस्ता लूट करण्यासाठी  खबर मिळाली होती. याबाबत राहुरी पोलिस स्टेशनला भादंवि ३९९, ४०२, आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल आहे. या घटनेचा तपास करत असतांना पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना यातील मुख्य आरोपी प्रदीप हा मुंबईमधील विरार येथे राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली.
 गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सपोनि शरद गोर्डे, उपनिरीक्षक सुधीर पाटील, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, नाईक रवींद्र कर्डीले, दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, संतोष लोंढे, संभाजी कोतकर, मच्छिन्द्र बर्डे आदींच्या पथकाने प्रदीपला ताब्यात घेतले.

प्रदीप याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या