ओझोन थर वाचवण्यासाठी प्रत्यक्ष सहभागाच हवा - प्रदीप काकडे


अहमदनगर । DNA Live24 - माणूस आपल्या पुढच्या पिढीला सुखाने जगता यावं, यासाठी मेहनत घेताना व भविष्याचं नियोजन करताना नेहमी दिसतो. पण आरोग्यदायी पिढी घडावी, त्याचे स्वतःचे आणि येणाऱ्या पिढीचं जगणं सुखकर आरोग्यदायी व्हावे, यासाठी धडपडताना दिसत नाही. जागतिक ओझोन दिनाच्या निम्मिताने सर्वांनीच ओझोन थर वाचवण्याच्या लढाईत प्रत्यक्ष व अप्रतक्ष सहभागी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आरंभ पॅलेटिव्ह केयर सेंटरचे प्रदीप काकडे यांनी केले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

अक्षर मानव पर्यावरण विभाग आणि आरंभ पॅलेटिव्ह केयर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिनाचे आैचित्य साधून क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर रविवारी सकाळी वृक्षारोपण, वृक्षसंगोपन आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अक्षर मानवचे पदाधिकारी विवेक शिंदे, विवेक शिंदे, संतोष शिंदे, अशोक चिंधे, ज्ञानेश्वर आजबे, डॉ. शिवाजी जाधव, मराठी मिशनच्या अध्यक्षा विजया जाधव उपस्थित होते.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

संयुक्त राष्ट्रसंघाने ओझोन थरात होणारा ऱ्हास आणि त्याचे वातावरणातील होणारे दूरगामी परिणामाचे गांभीर्य ओळखून १६ सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून घोषित केला आहे. हे औचित्य साधून मराठी मिशनच्या वसतिगृहातील अनाथ मुलामुलींच्या हस्ते आरंभ पॅलेटिव्ह कॅन्सर केयरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी नुसती झाडं लावलीच नाहीत तर झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

यावेळी ओझोनचे महत्व, ओझोन थराच्या विघटनाची कारणे, ओझोन थर वाचवण्यासाठीचे उपाय याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. जमेल तिथं, जमेल तेव्हा, नुसती झाडं न लावता त्यांचे संगोपनही करा, एयर कंडिशनर किंवा फ्रिजचा गरजेपुरता वापर करा, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी करण्यात अाले. कार्यक्रमाच्या अखेरीस विवेक शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

ओझोनचे महत्व - ओझोन तसा शास्त्रीय भाषेत म्हटलं तर तीन ऑक्सिजनच्या अणूंच्या संयुगाने तयार होणारा एक वायू. ह्या ओझोनचा माणसाच्या जीवनाशी ऑक्सिजन इतका प्रत्यक्ष संबंध नाही, पण ओझोनचे पृथ्वीभोवती साधारणतः जमिनीपासून ५० किमी अवकाशापर्यंत विविध थर आहेत. ओझोनचा थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे व पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचे संरक्षण करतो. म्हणजेच ओझोन हा वायू पृथ्वीवासीयांसाठी तितकाच महत्वाचा आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)