'हॉटेल मौर्य'मधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश


अहमदनगर | DNA Live24 - पुणे हायवेवरील चास शिवारात असलेल्या हॉटेल मौर्य येथील लॉजवर नगर पोलिसांनी छापा टाकून परराज्यातील ४ मुलींची सुटका केली. या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे रेडमुळे समोर आले आहे. लॉज मालक, दलाल आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चास शिवारात नगर - पुणे हायवेवर हॉटेल मौर्य आहे. तेथे लॉजिंगची देखील व्यवस्था आहे. या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक पूनम पाटील व नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी ही  रेड टाकली.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

त्यांच्यासोबत पोलिस हवालदार हरिभाऊ दळवी, महिला पोलिस ए. आय. शेख, युवराज गिरवले, पोलिस नाईक गणेश चव्हाण, राहुल शिंदे, साबीर शेख, आनंद सत्रे, विनोद पवार, संदीप जाधव यांच्या टीमने छापा मारून अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार हॉटेल मौर्य लॉज वरील परराज्यातील ४  मुलींची सुटका केली. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

लॉज मालक शुभम विजय कर्डीले (रा. खंडाळा ता. नगर), सोमेन बाबलू घंटेश्वरी (रा आडमबाग थाना, जि. हुगली, पश्चिम बंगाल), सचिन अशोक भाले (रा. जामगाव, ता. वसमत, हिंगोली) यांच्यावर स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सन १९५६ चे कलम ३, ४ व ७ प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भोसले हे करत आहेत.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

हा दुसरा छापा - चास शिवारात असलेल्या हॉटेल मौर्य येथे लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची बाब नवीन नाही. यापूर्वीही तेथे पोलिसांनी छापा टाकलेला आहे. त्यावेळीही काही पीडित महिलांची सुटका करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा तेथे छापा पडला आहे. पिता कायद्यानुसार आता हॉटेलवर काय कारवाई होते, याची उत्सुकता आहे.

 (आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)