राम मंदिरासाठी कायदा करा : विहींपची मागणी


मुंबई : श्रीराम मंदिर हिंदू समाजासाठी अस्मितेचा विषय आहे. करोडो हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी साधू संत, धर्माचार्य, महाराष्ट्र राज्य व हिंदू समाजाच्या भावनांचा विचार व्हावा. हिंदू समाजाची जास्त परीक्षा पाहू नये. तसेच अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी  केंद्र सरकारने कायदा करून अथवा अध्यादेश आणून भव्य राम मंदिर उभारणीसाठी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी परमपूज्य संत उचाधिकार समितीचे सदस्य आचार्य जितेंद्रनाथ यांनी राज्यपालांकडे केली आहे.

विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जितेंद्रनाथ महाराज, महामंडलेश्वर महाराज, विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री भाऊराव कुदळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, विदर्भ प्रांताध्यक्ष राजेश्वर निवल, विदर्भ मंत्री प्रा. अजय निलावदार आदी उपस्थित होते.

आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या