नगर मनमाड रस्त्यावर नर बिबट्याचा मृतदेह


अहमदनगर - राहुरीच्या जोगेश्वरी आखाड्या जवळील नगर मनमाड राज्य रस्त्यावर २ वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला आहे. त्याच्या अंगावर जखमा असल्याने वाहनाची धडक बसुन बिबट्या ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या ७ महिन्यात मृत अवस्थेत बिबट आढळल्याची तालुक्यातील ही सहावी घटना आहे.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)

नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या जोगेश्वरी आखाडा हद्दीत मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रस्त्याने जाणा-या नागरीकांनी या घटनेची माहिती नगरच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर राहुरीचे वनविभाग व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राज्य मार्गावर मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने बघ्यांच्या गर्दी जमली. त्यामुळे वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

या बिबट्याचे वय अंदाजे २ वर्ष असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचा मृतदेह वनविभागाच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेऊन डिग्रस ( राहुरी ) येथील वनविभागाच्या नर्सरीत ठेवला. बुधवारी दुपारी शव विच्छेदना नंतर या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एप्रिल २०१८ मध्ये राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील जाधव यांच्या डाळींब बागेत दीड वर्ष वयाची बिबट मादी मृतावस्थेत आढळली होती. नंतर वळण प्रिंपी येथील शेतात बिबट्याच्या मादीचा मृतदेह आढळला होता.

यावर्षी गेल्या सात  महिन्यात ५ बिबट्यांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे बिबट्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे स्पष्ट आहे. राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या