केडगावात शिवसेनेच्या वाघाची डरकाळी; विराट सभा


नगर : बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावात शिवसेनेने विराट सभा घेत डरकाळी फोडली. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे यांच्या भाषणाला केडगावकरांनी तुफान प्रतिसाद दिला. यावेळी बानगुडे यांनी भाजपसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


नितीन बानगुडे म्हणाले, कधीकाळी नगरची तुलना कैरो, बगदाद सारख्या शहरांशी होत होती. शहराचा इतिहास मोठा आहे. शहराचा भूतकाळ चांगला आहे, पण वर्तमान काय आहे? नगर शहराचं भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे.

निवडणुका जवळ आल्या की नुसती खोटी आश्वासन द्यायची. हेच भाजप, राष्ट्रवादीचे काम आहे. इतके दिवस लंगडी सत्ता असल्याने विकासाला मर्यादा आल्या. आता नगरकरांना संधी आहे. शिवसेनेला पूर्ण बहुमत द्या, मग शहराला विकास काय होतो ते नगरकरांना कळेल.

नगर शहरात जे काही चाललंय ते पाहून माझ्यासारख्याला शरमेनं मान खाली घालावी लागते. दहशतीच्या सावटाखाली खुलेआम इथं माणसं मारली जातात. कुठला तरी एक छिंदम उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो. तोच छिंदम पुन्हा निवडणुकीला उभं राहायचं धाडस दाखवतो. कोण पाठीशी घालतंय याला. त्याला पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मनपाच्या निवडणुकीत नातं-गोत काही नाही, असं म्हणणाऱ्यांनी एकदा प्रभाग क्रमांक ४ मध्ये जाऊन पाहावं. सगळे सोयरे -धायरे, पाहुणे-रावळे एक. जनतेच्या डोळ्यात धूळफेक, हीच खरी ग्यानबाची मेख.
केडगाव येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी उपनेते अनिल राठोड, शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींसह मनपा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या