'अहमदनगर फिल्म फाऊंडेशन'मुळे चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण


अहमदनगर - हे शहर आता चित्रपट निर्मितीचे केंद्र बनू पाहत आहे. अनेक गाजलेले चित्रपट अहमदनगर शहरात आणि जिल्ह्यात निर्माण होत आहेत. चित्रपटनिर्मिती आणि त्याविषयक गोष्टींसाठी अहमदनगरमध्ये आणखी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं यासाठी “अहमदनगर फिल्म फाऊंडेशन” या संस्थेची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. या संस्थेची कार्यकारिणीही नुकतीच जाहीर करण्यात आली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


नगर जिल्ह्याने अनेक कलाकार चित्रपटसृष्टीला दिले. कै. शाहू मोडक, प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकरांपासून ते सध्याचे भाऊराव कऱ्हाडे, महेश काळे, मिलिंद शिंदे, पूर्णानंद वांढेकर, हरीश दुधाडे, संदीप दंडवते इत्यादी कलाकारांनी आपल्या अभिनयातून, लेखणीतून, दिग्दर्शनातून नगरचा झेंडा चित्रपटसृष्टीत रोवला. त्यामुळे पुणे, मुंबई, कोल्हापुरनंतर चित्रपट निर्मितीचे नवे स्थान म्हणून नगरकडे पाहिले जाते. 

कमालीचे आकर्षण असलेल्या या क्षेत्राकडे अनेक तरुण तरुणी करिअरच्या संधी म्हणून पाहत आहे. पण प्रत्येकालाच पुणे-मुंबईला जाऊन करिअर करणे शक्य होत नाही. चित्रपट क्षेत्राची सर्व प्रकारची माहिती आणि प्रबोधन करण्याचे काम अहमदनगर फिल्म फाऊंडेशन हि संस्था करणार आहे.

ग्रामीण भागातील चित्रपट, दूरचित्रवाणी व तसेच इतर दृक्श्राव्य माध्यमात काम करत असणारे कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबवणे. या माध्यमातून अनेक हौशी कलाकार व तंत्रज्ञ यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नगरमध्येच उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील कलाकारांना आणि तंत्रज्ञांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी चित्रपट, लघुपट, माहितीपट, आदींची निर्मिती व्हावी म्हनुन संस्था काम करणार आहे. 

शहरातील रसिकांना जागतिक दर्जाचे उत्तमोत्तम चित्रपट, लघुपट पाहायाला मिळावे म्हणून चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणे. सोबतच या चित्रपट महोत्सवाच्या माधमातून स्थानिक कलाकार व निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील इच्छुक महिला कलाकार व तंत्रज्ञांसाठी महिला सबलीकरणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, वाहतुकीच्या व इतर आवश्यक साधनांची सहज उपलब्धता संस्था निर्मात्याना देणार आहे, निसर्गाने नटलेली स्थळ यामुळे अनेक निर्माते अहमदनगर जिल्ह्यात चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. त्याचा फायदा नगर जिल्ह्यातील कलाकार आणि तंत्रज्ञांना व्हावा यासाठी अहमदनगर फिल्म फाऊंडेशन कार्यरत राहणार आहे.

शहरात राहणारे नाट्य कलाकार व सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या तरुणांनी हि संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष प्रीतम होनराव हे आहेत. तर सारंग देशपांडे – उपाध्यक्ष, प्रशांत जठार – सचिव, राहुल उजागरे – उपसचिव व शैलेश थोरात हे खजिनदार आहेत. मंगेश जोंधळे आणि सिद्धार्थ लोंढे हे सदस्य आहेत. जास्तीत जास्त तंत्रज्ञ आणि कलाकारांनी या संस्थेचे सदस्य व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या