ऍम्प्लिफायर चोरणारी टोळी जेरबंद!नगर :
घरासमोर साउंड सिस्टीम लावून उभ्या असलेल्या टेम्पोमधून २ लाख ६० हजार रुपये किमतीचे ७ ऍम्प्लिफायर चोरणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून ३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील सतीश विठ्ठल ठुबे यांच्याकडे साऊंड सिस्टिम आहे. ही साऊंड सिस्टिम त्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये लावून ठेवली होती. 1 डिसेंबर रोजी ठुबे हे घरात झोपले असताना चोरट्यांनी सात ऍम्प्लिफायर टेम्पोतून चोरून नेले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा महेश शाम नेगी व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातल्या मोशी येथून महेश नेगी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हा गुन्हा त्याने अनिकेत बाळासाहेब बोराडे, मनोज प्रल्हाद भिडे (वय 19), सागर आत्माराम गायकवाड (वय 22, सर्व रा. आदर्शनगर, मोशी, तालुका हवेली) यांच्यासोबत केल्याची माहिती मिळाली . चोरीचा माल घरी ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानुसार महेश नेगी याच्या घरातून 5 अंपलिफायर व गुन्ह्यात वापरलेली कार (क्रमांक एम. एच. 14 सी. एक्स.  ०७68) असा एकूण तीन लाख 85 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल विजय कुमार वेठेकर, दत्तात्रय इंगडे, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, संदीप पवार, विजय ठोंबरे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, योगेश गोसावी राहुल साळुंके आदींच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या