'शरीरसुख दे, परीक्षेत पास करतो', पाध्यापकाने केली विद्यार्थिनींकडे मागणी


मुंबई :

बीएससीचे शिक्षण घेणार्‍या एका 19 वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीला इंटर्नल व एक्सटर्नल परीक्षेत पास करून देतो, अशी बतावणी करत शरीरसुखाची मागणी करणे एका कॉलेजच्या प्राध्यापकाला चांगलेच महागात पडले. तरुणीच्या तक्रारीवरुन गावदेवी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद करुन दिलीपकुमार लालमणी हरिजन या कॉलेजच्या प्राध्यापकाला शुक्रवारी अटके केली. स्थानिक न्यायालयाने आरोपीला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दिलीपकुमार हे गोरेगाव येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील वासरी हिल, सिद्धीविनायक सेवा सोसायटीमध्ये राहतात. सध्या ते गावदेवी येथील एका नामांकित कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. तक्रारदार 19 वर्षांची तरुणी याच कॉलेजमध्ये बीएससीच्या चौथ्या सेमिस्टरचे शिक्षण घेत आहे. जानेवारी 2018 पासून ती नियमित कॉलेजमध्ये हजर राहात होती. मात्र कॉलेज अ‍ॅडमिशनमुळे तिला रसायनशास्त्र विषयाच्या लेक्‍चर आणि प्रॅक्टीकलसाठी बसू दिले नव्हते. त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरु होते. मात्र तिच्या प्रयत्नांना यश आले नव्हते.

सोमवारी 18 फेब्रुवारीला ती महाविद्यालयामध्ये आली. झुलॉजी प्रॅक्टीकल आणि एनएसएस कार्यक्रम संपल्यानंतर ती साडेअकरा वाजता तिच्या मैत्रिणीसोबत रसायनशास्त्र विषयाचा लेक्‍चरसाठी गेली होती. साडेबारा वाजता क्‍लास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी बाहेर निघून गेले. यावेळी तिने तिचे प्रॅक्टीकल अर्धवट झाले असून रिपीटेशन कधी आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या