नगर दक्षिण जिल्ह्यातून डॉ. सुजय विखे निवडून येण्याची शक्यता किती?



DNALive24:
नगर दक्षिण जिल्ह्यातून राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून डॉ. सुजय हे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात आक्रमक प्रचार करत आहेत. काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी डॉ. सुजय इच्छुक असले तरी, आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने काँग्रेसची उमेदवारी मिळविताना विखेंच कस लागला आहे. योग्य नियोजन, कार्यकर्त्यांची फळी आणि आक्रमक प्रचार यामुळे डॉ. सुजय हे निवडणूक जिंकतील असा माहोल जिल्ह्यात बनविण्यात आला आहे. मात्र खरोखरच डॉ. सुजय निवडून येण्याची शक्यता आहे का?, उत्तर जिल्ह्यातील डॉ. सुजय हे दक्षिणेत पाय रोवणार का?, तशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे का? हे पाहणे महत्वाचे आहे.

(ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा लोकसभा मतदारसंघ भाजपने (युतीने) ताब्यात घेल्यापासून लोकसभेसाठीचे या मतदारसंघातील काँग्रेसचे अस्तित्व जवळपास शून्य झाले आहे. युतीकडून याच मतदारसंघात पूर्वी डॉ. सुजय यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे हे खासदार होते. त्यानंतर हा मतदारसंघ युतीच्याच ताब्यात गेला. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे चौथ्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीला माजी आमदार स्व. राजीव राजळे यांनी खा. दिलीप गांधींसमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यांनी अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यावेळेसही आताप्रमाणेच खा. गांधी पराभूत होतील अशी अटकळ राजकीय विश्लेषकांनी बांधली होती. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर नरेंद्र मोदींची सभा झाली आणि या मतदारसंघातील वातावरणच बदलून गेले. मोठ्या मताधिक्याने गांधी पुन्हा खासदार झाले.

(ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

सद्यस्थितीत या मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे, आ. शिवाजी कर्डीले, आ. मोनिका राजळे हे भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेचे विजय औटी हे पारनेरमधून आमदार आहेत. तर नगर शहरातून आ. संग्राम जगताप व श्रीगोंद्यातून आ. राहुल जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. काँग्रेसचा एकही आमदार या लोकसभा मतदारसंघात नाही. त्यात अजून राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली नसल्याने दोन्ही आमदार जगताप डॉ. सुजयना मदत करतील की नाही? हा प्रश्न आहे.

(ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. सुजय दक्षिण मतदारसंघात आरोग्य शिबिरे घेत आहेत. शिबिराचा आधार घेत कार्यकर्त्यांसमोर विरोधकांना डॉ. सुजय यांनी चांगलेच टार्गेट केले आहेत. ही शिबिरे घेतांना त्यांनी आजोबा स्व. बाळासाहेब विखे यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जवळ घेत जनसंपर्क वाढविला आहे. दक्षिण भागात तरुणाईमध्ये त्यांची चांगली क्रेझ आहे. आरोग्य शिबिरे असल्याने त्यांना प्रतिसादही मोठा मिळत आहे. मात्र शिबिरांना होणाऱ्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर किती प्रमाणात होणार? हा खरा प्रश्न आहे.

(ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

दुसरा खरा प्रश्न म्हणजे काँग्रेसमधील माजी महसूलमंत्री बाळासाहबे थोरात यांचा गट डॉ. सुजय यांना मदत करणार की नाही? हा आहे. थोरात गटाचे दक्षिण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. नगर शहरातही थोरात गटाचा प्रभाव दिसून येतो. असे असतांना थोरात गटाला दुखावणे डॉ. सुजय यांना धोक्याचे आहे. हे माहित असूनही नुकतेच डॉ. सुजय यांनी आ. बाळासाहेब थोरात यांना डिवचले. त्यानंतर विखे व थोरात गटात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आता डॉ. सुजय यांना याचा फटका बसू शकतो.

(ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

खासदार दिलीप गांधी यांच्यावर दक्षिणेत मोठी नाराजी आहे. अशात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून डॉ. सुजय यांना तिकीट मिळाल्यास त्यांची निवडून येण्याची शक्यता वाढते. आघाडीकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढणार असल्याचे डॉ. सुजय विखे म्हणत असले तरी ते तितके सोपे नाही. आघाडीकडून विखे उभे राहिल्यास त्यांना युतीमधील खा. गांधी यांच्यावर नाराज असलेल्यांची मदत होऊ शकते.

(हेही वाचा :खा. दिलीप गांधींवर दक्षिणेत शिवसैनिकांची नाराजी का? 
ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

शेवटची बाब म्हणजे, जिल्ह्यातला उत्तर आणि दक्षिण वाद. नगर जिल्ह्यावर नेहमीच उत्तर नगर जिल्ह्यातल्या नेत्यांचे राजकीय वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आपल्यावर नेहमीच अन्याय होत आल्याची भावना दक्षिण नगर जिल्ह्यात आहे. त्यातच डॉ. सुजय निवडून आल्यास ग्रामपंचायत पातळीवर प्रत्येक बाबतीत 'प्रवरे'चा हस्तक्षेप होईल, असाही प्रचार विरोधकांकडून होत आहे. डॉ. सुजय यांनी दक्षिणेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राजकीय चढाई सुरु केल्यानंतर दक्षिण जिल्ह्यात पुन्हा एकदा डॉ. सुजय यांच्या विरोधात 'उत्तरेतील आक्रमण दक्षिणेत नको' अशा मथळ्याखाली सोशल मीडियात मोहीम सुरु झाली आहे. त्याचा फटका डॉ. सुजय यांना बसतो की नाही? यावरच त्यांचे खरे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या