राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसनिष्ठता सिद्ध करावी : आ. बाळासाहेब थोरातनगर :
सुजय विखेंच भाजप प्रवेश झाला. असं करायला नको होत. काँग्रेसने विखे यांना सर्व काही दिल. मंत्रिपद, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिल. असं असतांना मुलगा हट्ट करतो. आणि दुसऱ्या पक्षात जातो, ही त्यांना शोभणारी गोष्ट नाही. त्यामुळे राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसनिष्ठता सिद्ध करावी, अशा शब्दात आ. बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर निशाणा साधला.

संगमनेर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. थोरात म्हणाले, ते विरोधीपक्ष नेते. राज्यात आमचे मोठे नेते. त्यांनी मुलाला आवर घालणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तस केलं नाही. काँग्रेस सोडणार नाही असं विखे म्हणत आहेत. मग सुजय भाजपात गेला याचा निषेध का केला नाही. त्यावर नाराजीही व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठतेवर शंका उपस्थित होत आहे.

विखेंना आमचे सरकार असतांना मंत्रिपद दिल. सरकार गेल्यावर विरोधीपक्षनेतेपद दिल. सर्व बाबतीत काँग्रेसने न्याय दिला. मग हे करण्याची गरज का लागली? असा सवालही थोरातांनी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या