मुलगा आ. संग्रामसाठी वडील आ. अरुणकाका जगताप उतरले प्रचारातनगर - 
राष्ट्रवादी कॉग्रेस- काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी आ.अरुण जगताप यांनी नगरमधील कापड बाजार, दाळमंडई, आडते बाजार या प्रमुख बाजारपेठेतून प्रचारफेरी काढली. भिंगारवाला चौकातील जैन मंदिरात मंगलपाठ करुन या प्रचारफेरीस सुरुवात झाली. आ.अरुण जगताप यांनी कापड बाजारामधील सर्व दुकानदार व्यापार्‍यांच्या गाठी-भेटी घेऊन नगर दक्षिणेत परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन केले.

कोहिनूर या प्रसिद्ध वस्त्रदालनात संचालक प्रदीप गांधी यांनी आमदार अरुण जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कोहिनूर दालनामधील दोनशेहून अधिक कर्मचार्‍यांशी आ.अरुण जगताप यांनी संवाद साधला.  तसेच ठिकठिकाणी व्यापारी वर्गाच्यावतीने आ.जगताप यांचे उत्स्फुर्त स्वागत करुन सत्कार करण्यात येत होता.

यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अ‍ॅड.अशोक कोठारी, प्रदीप गांधी, प्रकाश पोखरणा, सुभाष पोखरणा, किरण व्होरा, विनोद नारंग, बन्सी आसनानी, राजेंद्र बोथरा, अनिल पोखरणा, माजी नगरसेवक संजय चोपडा, श्रेणिक शिंगवी, अजित बोथरा, श्याम देडगांवकर, सुमतीलाल कोठारी, फारुक रंगरेज, रमेश सोनीमंडलेचा, अशोक पितळे, ठाकूर नवलानी, मनोज कटारिया, बाळू धाडिवाल, नरेंद्र बाफना, राजू ओसवाल, अजित बोथरा, संजय ताथेड, मुन्ना चमडेवाला, विपुल शेटीया, पप्पू मुंदडा, हरिष खुबचंदानी, माणिक विधाते, संजय बोरा, ज्ञानेश्‍वर रासकर, राजेंद्र चोपडा,  आदि प्रमुख व्यापार्‍यांसह कापड बाजारामधील व्यापारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या