राष्ट्रवादी जागा सोडत नसेल तर सुजयला त्याचा मार्ग मोकळा : ना. राधाकृष्ण विखेनाशिक : DNALive24 : 
काँग्रेसचे नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता जोर चढला आहे. खुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनीच याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. आघाडी नगरची जागा काँग्रेसला सोडत नसेल तर सुजयला त्याचे मार्ग मोकळे आहेत अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये बोलतांना दिली.

हेही वाचा : काॅंग्रेसच्या सर्वोच्च बाॅडीचा मी सदस्य, पण पोरगं इथं येऊन बोलतंय कसं : आ. बाळासाहेब थोरातांचा विखेंवर पलटवार

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा दावा नवा नाही. मात्र राष्ट्रवादी नगर मध्ये तीन वेळा पराभूत झाली आहे. म्हणून आम्ही यावेळी नगरची जागा काँग्रेससाठी मागत आहोत असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. चर्चेतून मुद्दा सुटला पाहिजे. विषय प्रतिष्ठेचा बनवणे अयोग्य आहे असे देखील विखे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान नगरची जागा राष्ट्रवादीची आहे आणि राष्ट्रवादीच लढवणार आहे असे अजित पवार यांनी म्हणल्याच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा : नगर दक्षिण जिल्ह्यातून डॉ. सुजय विखे निवडून येण्याची शक्यता किती?

नगरची जागा सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोबत सुरु असणाऱ्या वाटाघाटीच्या चक्रव्यूहात अडकून पडली आहे. वर्ध्याची काँग्रेसची जागा स्वाभिमानीला हवी आहे. तर काँग्रेस हि जागा सोडायला तयार नाही. त्या बदल्यात सांगलीची जागा काँग्रेसकडून काढून स्वाभिमानीला द्यायचा घाट शरद पवार यांनी घातला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या