राष्ट्रवादीला मतदान करण्याच्या विचारात असाल तर आठवा अजित पवार धरणं कसे भारतात ते : उद्धव ठाकरेDNALive24:
आगामी निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धरणे कशी भरतात हे आठवा. कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. इथे शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटले. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने आज शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांयकाळी ५ वाजता कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. जिल्ह्यातील तपोवन मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे, शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार तसेच चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


जनतेंचे आशिर्वाद हेच आमचे भांडवल आहे. त्यामुळे भगवा हा लोकसभेवर आणि विधानभेवर फडकवणारच आहेत. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धरणे कशी भरतात हे आठवा. असेही त्यांनी म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरेही नेहमी प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. कोल्हापुरातील तपोवन या मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी आई जगदंबेच्या आशिर्वादाने शिवकार्य सुरु केले आहे.

याचबरोबर, देवेंद्रजी तुम्ही शब्द दिला आणि पाळला, तुमचा मला अभिमान वाटतो. देवेंद्रजी पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, त्यांची जागा जनतेने दाखवली आहे. असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, शिवरायांनी सामान्य माणसाला असामान्यत्व दिले आहे. आणि आता भाजपा – सेनेनेही सामान्य माणसाला असामान्यत्व देत आहे. त्यामुळे, आता राजकीय धुळवडीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सगळे रंग एका बाजूला आणि आपला भगवा एका बाजूला असणार आहे असेही त्यांनी म्हंटले. आम्हाला सत्ता हवी गोर गरीबांसाठी, मजबूत देशासाठी आम्हाला सत्ता हवी आहे आणि सत्ता आल्यावर राम मंदिर होणार याबाबत खात्री आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटले. कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. इथे शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. त्यामुळे येत्या निवडणूकांमध्ये आपल्याला माथाडी कामगाराला मतदान करून त्यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवायचे आहे असेही त्यांनी म्हंटले.

युतीच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले असून सभेला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित झाले होते. याचबरोबर शहरातील प्रमुख चौकात स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या