नागराज मंजुळे आता करणार 'कोण होणार करोडपती'चे सुत्रसंचालन



मुंबई : 
सैराटसारखा हिट चित्रपट देऊन फेमस झालेला दिग्दर्शक नागराज मंजुळे आता सोनी मराठी या वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या रियालिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

नागराज मंजुळेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक टीझर पोस्ट करत माहिती दिली आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच हा रियालिटी शो सुरु होणार आहे. नागराजच्या रांगड्या भाषेचा साज आता या रियालिटी शो ला लागणार असल्याने या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

'कौन बनेगा करोडपती' या हिंदी शोचे सूत्रसंचालन बिग बी अमिताभ बच्चन हे करतात. नागराज मंजुळे यांच्या  सिनेमात बिग बी खुद्द झळकत आहेत. नुकतीच या सिनेमाचे शूटिंग नागपुरात पार पडले आहे. हिंदीतील कौन बनेगा करोडपती देखील लवकरच येणार आहे. त्यामुळे मराठी भाषेत नागराज मंजुळे आणि हिंदीमध्ये अमिताभ बच्चन अशी पर्वणी आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या