५६ इंचांचीच छाती देश चालवू शकते : मुख्यमंत्री फडणवीसDNALive24:
देश चालवायला ५६ पक्ष नाही लागत ५६ इंचाची छाती लागते. २६/११ झाल्यावर सरकारने फक्त निषेध केला आणि आम्ही उरी, पुलावामानंतर बदला घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने आज शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांयकाळी ५ वाजता कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. जिल्ह्यातील तपोवन मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे, शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार तसेच चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरेही नेहमी प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. कोल्हापुरातील तपोवन या मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या