पुढच्या एअर स्ट्राईकवेळी विरोधकांना विमानाच्या खाली बांधून नेऊ : केंद्रीय मंत्री व्ही के सिंगDNALive24:
‘पुढच्या वेळी भारताने जर काही केलं तर मला वाटतं विरोधक जे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांनी विमानाच्या खाली बांधून नेलं पाहिजे. जेव्हा बॉम्ब सोडणार असतील तेव्हा टार्गेट बघून घेतील. त्यानंतर त्यांना तिथेच उतरवलं पाहिजे. यानंतर त्यांनी मोजणी करावी आणि परत यावं’, अशा शब्दात केंद्रीय मंत्री व्ही. के सिंग यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकनंतर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकडेवारीवरुन विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावरुन केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी विरोधकांवर टीका करत पुढच्या वेळी विरोधी पक्षातील नेत्यांना विमानाला बांधलं पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या