स्पा सेंटर मध्ये चालत होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश


मुंबई :
अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यामध्ये पाच तरुणींचा समावेश आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ‘मॅग्नेट स्पा’ मध्ये केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस चौकशी करीत आहेत.

एमआयडीसीच्या अंतरिक्ष ठाकूर हाऊसमध्ये स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहीती गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ला मिळाली. पोलिसांनी याची खातरजमा करुन या ठिकाणी डमी ग्राहक पाठवला. ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या करावाईत सात जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच तरुणी, व्यवस्थापक आणि एका ग्राहकाचा समावेश आहे. मात्र, या स्पाचा मालक कुणाल राणा हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई प्रभारी महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सावंत, सहायक पोलीस निरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. या सर्वांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या