यांचे उद्योग काय आहेत, हे सांगण्याची गरज नाही : माजी आ. अनिल राठोडनगर : 
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने संयमी सुशिक्षित, नेतृत्वाला संधी दिलेली संधी दिली आहे. मात्र, समोरचे नेतृत्व कसे आहे ते सांगण्याची गरज नाही देशात नगर शहराचे नाव यांनी खराब केले. आता जिल्ह्याचीही अशीच परिस्थिती करायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांनी काम करताना कुणाचीही भीती बाळगू नये. हे फक्त फोन करून दम देतात. यांचे उद्योग काय आहेत, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आपण स्वतः उमेदवार आहोत, असे समजून काम करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. सुजय विखे यांना निवडून आणायचे आहे. यासाठीच हा संकल्प मेळावा आहे, असे सांगत नगर शहरातून विखेंना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा त्यांनी केला. दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती वरूनही त्यांनी फटकेबाजी केली. शहराचे राजकारच बदलले आहे. आपल्या सगळ्यांची ही कमाल आहे. मनपाची सत्ता शिवसेनेला देण्याची नगरकर यांची इच्छा होती. शिवसेनेचे २४ नगरसेवकही निवडून आले. आता तरी युती करा, अशा शब्दात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी राम शिंदे यांना उद्देशून त्यांनी मनपात युती करण्याची मागणी केली.

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीच्या व्यासपीठावरुन शिवसेना नेत्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. आ.शिवाजीराव कर्डिले व्यासपीठावर असल्याचे निमित्त साधत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह नगरसेवकांनीही आ. संग्राम जगताप यांच्यावर थेट हल्ला चढविला.

शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी मेळाव्यात बोलतांना आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासमोरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्यावर निषाणा साधला. मी कुणाला घाबरत नाही म्हणून थेट बोलतोय, असे म्हणतच त्यांनी भाषणाची सुरुवात केली. शहरात विकास व संरक्षण या मुद्द्यावर निवडणुका होतात. विरोधी उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावरच भाजपला पाठिंबा दिलेला आहे. केडगावची पोट निवडणूक सर्वांनीच पाहिली आहे. संरक्षणासाठी व दहशत मोडून काढण्यासाठी सुजय विखे सक्षम आहेत. त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी काहीच नसल्याने उत्तर-दक्षिण वाद घातला जात आहे, असेही ते म्हणाले.
नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनीही आ. जगतापांवर टीका केली. विरोधक म्हणतात आम्ही यांना राहुरीच्या पुढेच येउ दिले नसते. एवढी मोघलाई माजली आहे का? मतदार भीतीपोटी बोलून दाखवत नाहीत. मतदानातून करून दाखवतात. शहराचे आमदार विकासाच्या गप्पा मारतात. मात्र, माहिती काढा. साडेचार वर्षात साडेसहा मिनिटांपेक्षा जास्त ते सभागृहात बोलले असतील तर मी राजकारण सोडून देईल, असे आव्हानही त्यांनी दिले. दादागिरी, शिव्यांची आम्हाला आता सवय झालीय. नगरकरांनाही गुंडगिरी माहिती आहे. केडगाव प्रकरण झाले, केसेस झाल्या. शहरातील लोकांनाही एकावेळी काम नाही झाले तरी चालेल पण शांतता हवी आहे. गुंडगिरीमुळे शहरात उद्योगही येत नशीत. मी यातून गेलेलो आहे, वेदनाही भोगल्या आहेत. निव्वळ मी ओबीसी असल्याने मला यांच्याकडून डावलले गेले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दिलीप सातपुते, आशा निंबाळकर यांचीही भाषणे झाली.
मेळाव्यास पालकमंत्री राम शिंदे, महापौर बाबासाहेब वाकळे, आ. मोनिका राजळे, आ. शिवाजीराव कर्डिले, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, बाळासाहेब महाडीक, नामदेव राऊत, आशा निंबाळकर, रामदास भोर, प्रदीप पेशावर, विक्रम तांबे, सूर्यकांत मोरे, अशोक खेडकर आदींसह शिवसेना, भाजप, रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या