नगर दक्षिणेत आता तिरंगी लढत? सुवेंद्र गांधी अपक्ष लढण्याच्या तयारीत

(सोशल मीडियावर खा. गांधी समर्थकांकडून व्हायरल करण्यात येत असलेली पोस्ट)

नगर :
अहमदनगर दक्षिण लोकसभा  तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी अपक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. गांधी समर्थकांनी याबाबत सोशल मीडियावर व्हायरल केल्याने भाजपचे सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

भारतीय जनता पार्टीने खासदार दिलीप गांधी यांचे लोकसभेचे तिकीट कट केल्यानंतर गुरवारी रात्री खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तिकीट कट झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी खा.गांधी यांनी कार्यकर्त्यांना शांत रहा असे आवाहन करून भाजपचेच काम करायचे आहे अशा सूचनाही केल्या होत्या. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत.

काल पासून सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल होत आहे. 'नगर दक्षिण मतदारसंघात आता तिरंगी सामना' यात राष्ट्रावादी कॉंग्रेसचे आ.संग्राम जगताप, भाजपचे डॉ. सुजय विखे उमेदवार तर अपक्ष म्हणून सुवेंद्र गांधी उमेदवार अशी पोस्ट टाकण्यात आली आहे. यात डॉ.सुजय विखे यांची कॉंग्रेस प्रणीत भाजप उमेदवार अशी खिल्ली उडवण्यात आली असून सुवेंद्र गांधी यांना निष्ठावंत भाजपाचे उमेदवार म्हणून संबोधले आहे.

पुढील ध्येय- धोरणे बाबत उद्या रविवारी खा.दिलीप गांधी यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या या पोस्ट मुळे मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या खा.गांधी नेमकी काय भूमिका घेणार या कडे आता लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. गांधीच्या मुलाला महापालिका निवडणुकीत सुद्धा निवडून येता आले नाही ....त्याने काय खासदारकीची स्वप्ने बघू नयेत

    उत्तर द्याहटवा
  2. Su.Bhau aata Kahi diwas Ghari basun apalya pakshaache pramanikpane Kam kele tar far bare Hoel nahitar kayamche Ghari basal!

    उत्तर द्याहटवा