अंगावर भिंत कोसळून तीन मजूरांचा मृत्यू



नगर : 
शहरातील सथ्था कॉलनी परिसरात अंगावर भिंत कोसळून तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रोहन विजय फुलारे (वय २२, बुरुडगाव, ता.नगर), राहुल विजय फुलारे (वय २६, बुरुडगाव, ता.नगर), गोविंद शंकर शिंदे (वय ३२, बुरुडगाव) अशी मृत मजुरांची नावे आहेत. सथ्था कॉलनीत एका घराचे काम सुरु असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या