सुजय विखे यांनी नगर शहराच्या विकासास चालना द्यावी : वसंत लोढा


नगर -  
भारतीय जनता पार्टीने विकासाचा दृष्टीकोन असलेला व उच्च शिक्षित उमेदवार नगर दक्षिणसाठी लोकसभेसाठी दिला आहे. विकास कामे करण्याचा वारसा त्यांनी आजोबा व आई-वडिलांकडून मिळाला आहे. नगर दक्षिण लोकसभेतून डॉ.सुजय विखे यांचा विजय व्हावा, यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न करणार आहे. नगर शहर इतर शहरांच्या मानाने मागे आहे. नगर शहराचा विकास व्हावा, यासाठी सुजय विखे यांनी प्रयत्न करुन शहराच्या विकासास चालना द्यावी, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी केले.

भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांनी माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची निवासस्थानी भेट दिली. यावेळी निवडणुकीसाठी वसंत लोढा यांनी डॉ.विखे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुमारे तासभर डॉ.विखे व लोढा यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.  याप्रसंगी सदा देवगांवकर, अ‍ॅड.अच्युत पिंगळे, धनंजय जाधव, हस्तीमल लोढा, पारस लोढा, नितीन कुंकूलोळ, मुकुंद देवगांवकर, संजय झिंजे आदि उपस्थित होते.

डॉ.विखे म्हणाले, वसंत लोढा हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुक लढवितांना सर्वांचे सहकार्य व आशिर्वाद मला पाहिजे आहेत. वसंत लोढा यांनी निवडणुकीसाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांना मी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या