नगर ते पुणे रेल्वे प्रवासासाठी कॉड लाईनचे काम पुर्णत्वाकडे


45 मिनिटांनी कमी होणार प्रवासाची वेळ : प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
नगर - 
रेल्वेने नगर ते पुणे प्रवास काही मिनिटांवर आनण्यासाठी लवकरच कॉड लाईनचे काम पुर्ण होत असल्याचे विभागीय रेल्वे अधिकारी हितेंद्र मल्होत्रा यांनी सोलापूर येथे झालेल्या रेल्वे विभागीय सल्लागार सदस्यांच्या बैठकीत जाहिर केले. कॉड लाईनचे काम झाल्यानंतर अहमदनगर रेल्वे स्टेशनसाठी टर्मिनल सुविधेचा विचार करण्यात येणार असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. रेल्वे विभागीय सल्लागार सदस्यांच्या बैठकीत उपस्थित असलेले रेल्वे सल्लागार समिती सदस्य तथा उद्योजक हरजितसिंह वधवा यांनी माहिती दिली. तर प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या महिन्यात कॉड लाईनचे काम पूर्ण होत असून, नगर-पुणे रेल्वे मार्गाने हे अंतर सुमारे 45 मिनिटांनी कमी होणार आहे. नगर मधून जाणार्‍या सुमारे 30 रेल्वे गाड्या दौंड येथे इंजन बदलण्यासाठी अर्धा-अर्धा तास थांबत असत. यामुळे हा वेळ वाचणार आहे. अनेक दिवसांपासून नगरकरांची ही मागणी होती. यासाठी प्रवासी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला असता त्याला यश आले असल्याचे वधवा यांनी सांगितले. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने हरजितसिंह वधवा, अशोक कानडे, विपुल शाह, संजय सपकाळ, अजय दिघे, संतोष बडे, संजय वाळुंज, प्रशांत मुनोत, विपुल शहा, एस.बी. रुणवाल, सुनील छाजेड, मिलिंद बेंडाळे, धनेश कोठारी, अजित चाबुकस्वार, विश्‍वनाथ पोंदे, श्रीपाद शहाणे आदिंसह राजकीय पुढार्‍यांनी पाठपुरावा केला होता. यासाठी रेल्वे अधिकारी आर.के. गांधी, श्री पुरकर यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या