नगर, श्रीगोंदा, जामखेड व कर्जत तालुक्यात सुजय विखेंना धक्का; कार्यकर्ते राष्ट्रवादीत


नगर : 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरामध्ये झालेल्या सभेत नगर, श्रीगोंदा, जामखेड व कर्जत तालुक्यांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ.संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, राहुल जगताप, मंजूषा गुंड, हर्षदाताई काकडे, निर्मलाताई मालपाणी, आ.अरुणकाका जगताप, घनश्याम शेलार आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

सत्ताधारी भाजपने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर फक्त घोषणा करुन, त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले नाही. शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन कर्जमाफी देखील दिली. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या भाजपा सरकारने शेतकर्‍यांना देशोधडीस लावले. शेतकर्‍यांच खरे सरकार येण्यासाठी आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पक्षात प्रवेश केलेले चिचोंडी पाटीलचे मा.सरपंच शरद पवार खंडेराव, अंजना पवार, महेश जगताप, संदीप सुरवसे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, कमलाताई माळी, शंकर पवार, हाजी इम्रान युसूफ, शहाजी गोरे, दिलीप कांकरिया प्रमुख कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या