विखेंना धक्का; भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते आ. संग्राम जगतापांच्या प्रचारात


नगर - 
नगर तालुक्याचे जावई असलेले आ. संग्राम जगताप यांच्या लोकसभा निवडणुकीत या तालुक्यातील भाजप आणि शिवसेनेच्या हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिंपळगाव लांडगा येथे एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के, माधवराव लामखडे, उध्दवराव दुसूंगे, बाबासाहेब खर्से आदींच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाजप आणि सेनेचे हजारो कार्यकर्ते यावेळी स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. या तालुक्याचे जावई आ. संग्राम जगताप यांच्या विजयासाठी ही सर्व मंडळी सरसावली असल्याचे यावेळी स्पष्टपणे जाणवले.

यासंदर्भात काहींनी खासगीत बोलतांना सांगितले, की जर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेले नेते काँग्रेसच्याच व्यासपिठावरुन स्वतःच्या मुलाला (भाजप उमेदवार) मदत करण्याचे आवाहन करु शकतात, तर आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तालुक्याच्या जावयासाठी पुढाकार घेतला म्हणून काही फार मोठा डोंगर कोसळणार नाही.

या कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब दरेकर होते. यावेळी श्रीगोंद्याचे आ. राहूल जगताप, जि. प. सदस्य प्रताप शेळके, केशवराव बेरड, बाजार समितीचे संचालक रोहिदास कर्डिले,  किसनराव लोटके, आरु सर, मोहंमद शैख, कुमार वाघ, बाबा सय्यद, शरद बडे, विठ्ठल पालवे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी 'उत्तरे'च्या आक्रमणावर तोंडसुख घेतले. आ. राहूल जगताप म्हणाले, भाजप सरकार किती खोटारडे आहे, याची प्रचिती गेल्या साडेचार वर्षांत आपल्या सर्वांना आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी, युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतमालाला दीडपट हमीभाव, महिलांना संरक्षण, प्रत्येकाच्या बँक खात्यावर प्रत्येकी १५ लाख यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता हे सरकार करु शकले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय होईल, याचा विचार न करता आम्ही सर्वजण आ. संग्राम जगताप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत.

आ. संग्राम जगताप म्हणाले, या सरकारमधील लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. 'बेटी बचाव बेटी पढाव'चा केवळ नारा देत असलेल्या या सत्ताधारी सरकारमधील आमदार निर्लज्जपणे खुशाल म्हणतात, मुली पळवून आणा. स्वतः च्या नावाचीही या लोकांनी इज्जत घालवून रावणालाही लाज वाटेल, असे वक्तव्य केले. देशासाठी सिमेवर शहिद होणाऱ्या जवानांच्या विर पत्नींविषयी हे अत्यंत किळसवाणे बोलतात. आज देशात शेतकरीहिताचे धोरण राबविण्याची नितांत आवश्यकता असतांना शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतमालाला हमीभाव याविषयी ही मंडळी तोंड उघडायलाही तयार नाहीत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ते सत्तेत असतांना या पदाची पर्वा न करता अजिबात शेतमालाचे भाव कमी केले नाही. त्यामुळे आपल्या स्थानिक समस्या आणि विकासाचे प्रश्न यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्यावी.असे आवाहन आ. जगताप यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या