मला जनतेने मुख्यमंत्रीपदावर बसविले पण तुम्हाला थेट घरीच : मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर


नांदेड :
आज मनसेची अवस्था काय आहे हे सर्वांना माहिती आहे. मनसेची अवस्था ही ‘उनसे’ अर्थात उमेदवार नसलेली सेना अशी झाली आहे. राज ठाकरे लग्न दुसर्‍याचे असताना स्वतःच नाचत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढविला आहे. गुजरातला पाणी देण्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतांना ते अभ्यास न करताच बोलत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.


गोदीवरीचे पाणी गुजरातला वळवले जात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. सोबतच फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी नांदेड येथील प्रचारसभेत बोलतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे यांना निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे ते काहीही बोलताहेत आहेत. त्यांना कुणाला काही पुरावाही द्यायचा नाही. राज ठाकरे यांनी माझ्यावर बसवलेले मुख्यमंत्री असल्याची टीका केली. मात्र, जनतेने मुख्यमंत्रीपदावर बसवले, तुम्हाला मात्र घरीच बसवले, तुमचा सुपडा साफ केला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. राज ठाकरेंची अवस्था आधे इधर, आधे उधर, बाकी मेरे पीछे आव, अशी झाली आहे. अभ्यास न करता ठाकरे आरोप करत असतात. महाराष्ट्राच पाणी गुजरातला दिले,  असा आरोप ठाकरे यांनी केला. मात्र, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा करार अशोक चव्हाणांनी केला होता. तो नारपारचा करार या पठ्‌ठ्याने रद्द करून राज्याचे  हक्काचे पाणी आणले, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरेंना ‘किराया’ने आणले, हा नवा पॅटर्न!
काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाण म्हणायचे राज ठाकरे डराव डराव करतात. आता मात्र, त्यांनाच ‘किराया’ने आणले आहे, असा आरोपही मुख्यमंत्री फडणरीस यांनी यावेळी केला. अशोकरावांना सभेसाठी किरायाने लोकं आणावी लागतात. आता तर त्यांनी नेता देखील किरायाने आणला. आपल्या समर्थनार्थ किरायाने नेता आणण्याचा पॅटर्न आणला आहे, अशी टीकाही त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या