..तर देशात अराजकता माजेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Screenshot_2019-04-26-13-00-44-89

श्रीरामपूर : प्रतिनिधी
सत्ता आल्यास काँग्रेसने देशद्रोहाचे कलम हटविणार असल्याचे आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. परंतु, हे कलम हटविल्यास देशात अराजकता माजेल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्‍त केली.


शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे झालेल्या विजय संकल्प सभेत मुुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडेे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या ताब्यात 60 वर्षे सत्ता होती. या काळात अनेक ठिकाणी अनाचार, दुराचार झाल्याचे दिसते. काँग्रेसने पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा दिला आहे. अनेक पिढ्या त्यांच्या हातात सत्ता असूनही, त्यांना गरिबी हटविता आली नाही. आता ते म्हणतात, प्रत्येकाला 72 हजार कोटी देणार. परंतु हे कोठून देणार? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबीविरोधात मोठा लढा दिला. जनधन योजनेंतर्गत 34 कोटी गरीब लोकांची खाती उघडली. त्यामुळे अनेक योजनांचे 80 हजार कोटींचे अनुदान थेट बँकेत जमा झाले. त्यामुळे दलाली कमी होऊन अनेक गैरव्यवहार कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या