मतदानाला जाताय; मग ही ओळखपत्रे आवश्यक!


नगर :
देशात उद्या (दि. २३) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. अनेक मतदारांना मतदानासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती नाही. मात्र निवडणूक आयोगाने ११ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानाच्या प्रक्रियेवेळी दाखवावे लागणार असल्याचे सांगितले आहेत. त्यामुळे उद्या जर तुम्ही मतदानासाठी जाणार असाल तर यापैकी एक ओळखपत्र घेऊन जावे लागेल.


मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदान ओळखपत्र (ईपीक कार्ड) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी इतर ११ पर्यायी दस्तावेज ग्राहय धरण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

नागरिकांनी मतदान ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम ह्यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र, बॅंक, पोस्ट ऑफीसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय)द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तावेज, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदानावेळी सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या