शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह आंदोलकांवर गुन्हे दाखल

IMG-20190426-WA0055


नगर : प्रतिनिधीमहापालिकेत आंदोलन करून गोंधळ घालत शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट फेकल्याप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह तीस जणांविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला शुक्रवारी (दि.२६) रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


यात राठोड नगरसेवक अशोक बडे, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, मदन आढाव, शैलेश भाकरे, आकाश कातोरे, माजी आमदार अनिल राठछोड, विशाल वालकर, गिरीष जाधव आदींचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बूट फेकणाऱ्या मदन आढाव यास रात्री अटक करण्यात आली आहे. विलास सोनटक्के यांनी फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या