कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा; थोरातांना दणका

Ahmednagar-Karan-Jayant-sasane

नगर : प्रतिनिधी
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेच्या एक दिवस आधीच कॉंग्रेसअंतर्गत नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण ससाणे यांनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष सोडणार नसल्याची भुमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली असली तरी  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा दणका मानला जात आहे. 


शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या वक्तव्यांमुळे ससाणे समर्थक नाराज होते. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे करण ससाणे यांनी सांगितले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. उद्या राहुल गांधी यांची उत्तरेत सभा होत असून यात विखेंसंदर्भात मोठी घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, तत्पूर्वीच ससाणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे थोरात यांना मोठा झटका बसल्याचे चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या