आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार थापाडे आणि पक्के 'अर्धवटराव' : आ. संग्राम जगतापनगर :
सरकार म्हणते, चारा छावण्यांमध्ये सीसीटीव्ही कँमेरे बसवा. पण मग यासाठी वीज नको का, की नुसतेच शो साठी सीसीटीव्ही कँमेरे बसवायचे. एक तर या सरकारने  चारा छावण्या सुरु करण्यास मोठा विलंब केला आहे.  त्यातही इतक्या अटी आणि शर्ती लादल्या, यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता संबंधितांच्या नाकीनऊ येतात. या सरकारने शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक केली. यांच्या छान भाषणांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणे शक्य नाही. कांद्याचे भाव तर इतके पडले, की शेतकऱ्यांना कांदा काढणीचेदेखील पैसे मिळाले नाहीत. या सरकारप्रमाणेच आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार थापाडे आणि पक्के 'अर्धवटराव' आहेत. ते विचारतात, आम्हाला साकळाई आणि कुकडीबद्दल काय माहिती आहे? माझा त्यांना प्रश्न आहे, डोनेशनच्या बँगा गोळा करण्याच्या व्यस्ततेमध्ये तुम्हाला पेपर वाचायला वेळ मिळतो का? आ. राहूल जगताप, आ. वैभव पिचड आणि मी अशा तिघांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवून गदारोळ केला. त्यामुळे आम्हाला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होतै. हे जर तुम्हाला माहित नसल्यास तुमच्या वडिलांना विचारा. शहरी  भागाचा आमदार असलो  तरी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला जान असून ते सोडवसाठी वेळोवेळी विधानभवनात विषय मांडला असल्याचे आ. संग्राम जगताप म्हणाले.

नगर तालुक्यातील वाळूंज येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेसचे आ. राहुल जगताप, परसराम भगत, किसनराव लोटके, माधवराव लामखडे, रोहिदास कर्डिले, रंगनाथ निमसे, प्रा. अरविंद शिंदे, सरपंच भाऊसाहेब शिळमकर, गोरख सुपेकर, मोहनराव बोठे, कडूजी बेरड, अनिल ठोंबरे, तुकाराम वाघुले, बाबा सय्यद आदींसह राष्ट्रावादी – कॉंग्रेस मित्रपक्षाचे पदाधिकारी व मोठ्यासंख्याने स्थानिक नागरिक उपस्थित होते.


येत्या २३ तारखेला होत असलेली लोकसभेची निवडणूक जनतेच्या प्रश्नांची आणि स्वाभिमानाची निवडणूक आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपले, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणारे लोकप्रतिनिधी निवडीच्या या प्रक्रियेत अजिबात चूक होऊ देऊ नका. या सरकारने गेल्या साडेचार वर्षांत पोकळ घोषणा करून आपल्या सर्वांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे या फसव्या भाजपच्या  सरकारला घरी बसवा, असे आवाहन श्रीगोंदा तालुक्याचे आ. राहूल जगताप यांनी केले.

या मेळाव्यास संपतराव म्हस्के, शहाजी नवसूपे, घनश्याम म्हस्के, रावसाहेब गेरंगे, अर्जुन गेरंगे, पोपट परभाणे, शरद चोभे, संभाजी कोतकर, संपत बारस्कर, शिवाजी चव्हाण, बाळासाहेब परभाणे, शरद बोठे, कैलास चोभे, रमेश भांबरे, बाळासाहेब कोठूळे आदींसह खडकी, खंडाळा, रतडगाव, वाळकी,दरेवाडी आदींसह विविध ठिकाणचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या