मुळा उजव्या कालव्यातून ५ एप्रिलपासून आवर्तन सोडणारनगर  -  

मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन येत्या ५ एप्रिलपासून सुटणार आहे.  त्यासाठी राहुरी, नेवासे, शेवगाव तालुक्यातील तलावांची संख्या, आवश्यक पाणी व अन्य विषयांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली.

या चार तालुक्यातील गावांची तहान भागविण्याच्या दृष्टीने येथील जलस्त्रोत भरुन घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरु आहे.

अनुषंगिक माहिती प्राप्त झाल्यानंतर परिपूर्ण प्रस्तावास मान्यता घेतली जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन जवळपास पूर्ण झाले असून दिनांक ५ एप्रिलपासून आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या