राहुल गांधींच्या विमानात बिघाड; संगमनेरची सभा उशिराने

how-come-all-thieves-have-modi-in-their-surnames-asks-rahul-gandhi


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाच्या इंजिनात आज सकाळी पाटणाकडे जाताना बिघाड झाला. त्यामुळे राहुल यांना तातडीने दिल्लीला परतावे लागले. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. विमानातील बिघाडामुळे त्यांच्या महाराष्ट्रातील संगमनेर, बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोरमधील नियोजित सभा उशिराने सुरू होणार आहेत.

IMG_20190426_115302

राहुल गांधी यांच्या आज बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे प्रचार सभा होणार होत्या. समस्तीपूर येथील सभेसाठी राहुल हे विमानाने जात होते. सकाळी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला. विमानाच्या कॉकपीटमधील व्हिडिओ त्यांनी ट्विट करून तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. या उद्भवलेल्या समस्येमुळे संगमनेरसह बिहार आणि ओडिशातील सभा सुरू होण्यास विलंब होणार आहे, असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या