सत्तेवर येवूनही मोदींची थापेबाजी सुरूच : राहुल गांधी

INC-1223-696x250


वेब न्यूज
सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी, तरुणांना मोठी स्वप्ने दाखवली. मात्र, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देण्याच्या थापा मारुन ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यावरही थापेबाजी सुरुच आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. मोदींनी जनतेची फसवणूक केली. मात्र आम्ही पूर्ण अभ्यास करुन तयार केलेली 'न्याय योजना' घेऊन येत आहोत. त्यातून गरिबांना न्याय, अर्थव्यवस्थेला चालना आणि नोकऱ्या उपलब्ध होतील, असे  आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.


शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी संगमनेरमध्ये सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता नोटाबंदी केली, रात्री बारा वाजता गब्बरसिंग टॅक्स (जीएसटी) लागू केला. शेतकरी, महिलांचे पैसे घेऊन बँकेत टाकले. नोटाबंदीमुळे बाजारातील खरेदी बंद केली. २०१९ च्या निवडणुकीनंतर कर्जासाठी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जाणार नाही. सरकार कायदा बनवेल. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प आम्ही मांडू. दोन कोटी लोकांना रोजगार मिळेल, असे सांगतानाच रोजगार देण्याऐवजी मोदींनी रोजगार हिरावून घेतल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे... 

 • अनेक वर्षांनंतर कोणत्याही पंतप्रधानाला संपूर्ण बहुमत दिले.
 • देशाने त्यांच्यावर भरवसा ठेवला होता. 
 • अच्छे दिनची घोषणा दिली होती. शेतकऱ्यांना आश्वासन दिले की त्यांचे कर्ज माफ करणार 
 • ५६ इंचाच्या चौकीदाराने तरूणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. 
 • मला मत द्या.. १५ लाख सर्वांच्या खात्यात देईन, असे म्हटले होते. 
 • पाच वर्षापूर्वी ऐतिहासिक संधी जनतेने दिली होती. पण ४५ वर्षांतील सर्वात जास्त बेरोजगारी आज भारतात आहे.
 • शेतकऱ्यांची हालत तुम्हाला माहिती आहे. पण आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथे सरकार आल्यावर लगेच दोन दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 
 • खात्यात १५ लाख रूपये देणार अशी घोषणा केली. त्यावेळी त्यांचा हा विचार मला पटला होता. कारण देशातील गरिबाच्या वाट्याला काही येईल, याने मलाही बरे वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही.  ही खोट्या आश्वासनांची खैरात होती.
 • मग मी खरं काय होऊ शकतो याचा शोध घेतला.
 • देशातील सरकार गरिबांना काही देऊ शकणार का, यासाठी मी योजना तयार केली.
 • देशातील तज्ज्ञांना बोलावले. अर्थव्यवस्थेला नुकसान न करता देशातील गरिबाच्या खात्यात पैसे टाकता येतील का, असा प्रश्न त्यांना केला.
 • तज्ज्ञांनी मला विचारले, या पूर्वी कोणी असे केले नाही, जगातील कोणत्याच सरकारने दिले नाही. 
 • मी त्यांना सांगितले की, देशातील उद्योगपतींना अंबानी, मेहूल चोक्सी यांना मोदी देऊ शकतात, तर गरीब जनतेला का देऊ शकत नाही.   
 • ७२ हजार रुपये २५ कोटी लोकांना देऊ शकणार अशी योजना केली.  
 • ६ हजार रुपये प्रति महिना देऊ शकतात, असे तज्ज्ञांनी मला सांगितले.  
 • देशातील २५ कोटी लोकांना वर्षाचे ७२ हजार रुपये दिले तर अर्थव्यवस्थेला नुकसान होणार नाही.  
 • नरेंद्र मोदी यांनी नोट बंदी केली, गब्बर सिंग टॅक्स लागू केला.  देशातील जनतेच्या हातातील पैसा हिसकावला आणि अनिल अंबानी यांच्या खिशात टाकला.  
 • देशातील जनतेने वस्तू खऱेदी करणे बंद केले. दुकानात माल विकणे बंद झाले, कंपन्यांमध्ये माल तयार होणे बंद झाले. अनेक लोक बेरोजगार झाले.  
 • ७२ हजार रुपये न्याय योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.  
 • आम्ही शेतकऱ्याकडे गेलो, शेतकऱ्यांनी एक सूचना केली आणि प्रश्न विचारला.  राहुलजी अनिल अंबानी देशाचे ३५ हजार कोटीचे कर्ज घेऊन बाहेर फिरतात. २० हजाराचे कर्ज घेऊन देशातील शेतकरी जेलमध्ये भरला जातो. 
 • पण २०१९ नंतर काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर कोणत्याही शेतकऱ्याला जेलमध्ये टाकले जाणार नाही. 
 • देशात एक बजेट होते, पूर्वी दोन बजेट व्हायचे रेल्वे आणि मुख्य बजेट व्हायचे.  
 • आता काँग्रेस सत्तेत आले तर शेतकऱ्यांचे बजेट होणार आहे.  देशातील शेतकऱ्यांना किती पैसे देणार हे या बजेटमध्ये सांगणार 
 • मोदींनी २ कोटी लोकांना रोजगाराचे आश्वासन दिले आहे, पण त्यांनी पूर्ण केले नाही. 
 • काँग्रेस पक्ष २० लाख नोकऱ्या देऊ शकतो. ग्रामपंचायतीत १० लाख रोजगार उपलब्ध होऊ शकतात. 
 • उद्योग सुरू करताना तरूणांना कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही. ३ वर्षांनंतर सरकारकडे जाऊन परवानगी मागायची आहे. 
 • आता तुम्हाला ठरवायचे आहे की कोणाला सत्तेत आणायचे आहे
 • द्वेष, खोटेपणा की प्रेम, आदर आणि सद्भावना..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या