ह्या अप्पलपोट्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला : आ. संग्राम जगताप


नगर : 
स्वतःच्या आईवडिलांवर उपकार करु शकत नाही, ते काय जनतेवर उपकार करणार ? या महाशयांनी आणि त्यांच्या पिताश्रींनी स्थानिक नागरिकांवर केलेल्या अन्यायाची यादी वाढतच चालली आहे. सामान्य जनतेच्या अन्नात माती कालवून स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेतले, असा घणाणती आरोप उमेदवार संग्राम जगताप यांनी विरोधी उमेदवारावर केले. ते पुढे म्हणाले ,  या महाभागांनी वाट्टेल त्या थराला जाण्याचा उद्योग केला. शिर्डीतील राजेंद्र गोंदकर यांच्या सारख्या अनेक नागरिकांची फसवणूक केले आहे. या सर्वांवरझालेल्या अंन्यायकारक प्रकाराची सखोल चौकशी करण्याची या निवडणुकी नंतर शासनाकडे मागणी करणार आहोत.  शहरी भागातील आमदार असतांनाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी विधानसभेचे  कामकाज पाडले, मला आ.राहुल जगताप आम्हाला निलंबित करण्यात आले. मात्र दुसरीकडे आयत्या बिळावरचे नागोबा असलेल्या या विरोधी उमेदवाराला शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही. यांच्यासाठी पक्षाने याआधी कँबिनेट मंत्रीपदाचा दर्जाचे  जि. प. अध्यक्षपद, मुख्यमंत्रीपदाची बरोबरी करणारे विरोधी पक्षनेते पद, यांच्या आजोबांना केंद्रात मंत्रीपद देऊनही ही अप्पलपोटी असलेली मंडळी कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून नाही नाही म्हणत शेवटी सत्ता व पदासाठी जातीयवादी भाजपालाच जाऊन मिळालेच. त्यामुळे भविष्यात हे दक्षिणेत आले, तर तुमच्या आमच्या ग्रामपंचायतींच्या राजकारनातही लक्ष घालतील. प्रत्येकवेळी लोणीला जावे लागणार आहे. त्यामुळे या संधीसाधू लोकांना स्वाभिमानी मतदारांच्या दक्षिणेत अजिबात अतिक्रमण करु देऊ नका, असे आवाहन उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी केले.

श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी, निंबवी, अरणगाव दुमाला, देवदैठण, हिंगणी, राजापूर आदी गावांतील मतदारांच्या गाठीभेटी आणि त्यांच्याशी हितगुज साधण्यासाठी सभा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी आ. जगताप बोलत होते. यावेळी श्रीगोंद्याचे  आ. राहूल जगताप, जि. प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब  भोस, बाजीराव मुरकुटे, बंडू आढावा, अतूल लोखंडे, अभय शिर्के, संभाजी शिर्के, एकनाथ लबडे,. सर्जैराव जाधव, सुभाष वाघमारे, संतोष बनकर, सुरेश लोखंडे, बाळासाहेब कोरके, अरुण वाघमारे, जयवंत गायकवाड, निव्रुत्ती वाखारे, बादशाह मनियार, किसन वाखारे, सुभाष राक्षे, हरिदास वाळूंज, सदाशिव वाखारे, भाऊसाहेब शिंदे, तुकाराम चाहेर, दीपक जांभळकर, पिंटू जांभळकर, अण्णा येवले, नितीन श्रीराम, रमेश गव्हाणारे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गावात आ.संग्राम जगताप यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

संग्राम जगताप पुढे म्हणाले,  राज्याची आणि देशाची सत्ता हडपण्यासाठी भाजपवाल्यांनी वाट्टेल ती आश्वासने दिली. मात्र पाच वर्षात ती आश्वासने पूर्ण करणे अशक्य असल्यने पुन्हा सत्ता हडप करण्यासाठी 'खोटं बोल पण रेटून बोल' असा खोटा प्रचार सध्या करत आहे. दरम्यान, आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार देखील या भाजपवाल्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालले आहेत. ते 'आयत्या बिळावरचे नागोबा' आहेत.

आ. राहुल जगताप म्हणाले, केंद्र आणि राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी या लोकांना तरुणांना दरवर्षी २ कोटी रोजगार देण्यासह पहिल्याच कँबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र एकाही तरुणाला रोजगार मिळू शकली नाही. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांना रात्रीबेरात्री सायबर कँफेत चकरा मारायला लावले. कर्जमाफीसाठी दिडशे प्रकारची कागदपत्रे भरुन घेतली. मात्र ही कर्जमाफी देण्याच्या भानगडीत सुरुवातीला सरसकट नंतर निकष लावून आणि तत्वत: कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र गेल्या साडेचार वर्षांत मुख्यमंत्र्यांनी केवळ अभ्यास करण्यापलीकडे काहीच केले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या