पाथर्डीकरांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवायचे पाप लोणीकरांचे : प्रताप ढाकणेंचा हल्लाबोल


पाथर्डी : तालुका प्रतिनिधी
लोणीकरांनी पाथर्डीकरांच्या हक्काच्या पिण्याच्या पाणी योजनेतत खोडा घातला. सुरु झालेले पाटपाण्याचे काम बंद पाडले आणि बंद पाईप द्वारे पाणीपुरवठा करण्याचे जनतेला गाजर दाखविले. त्यामुळे पाथर्डीकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप लोणीकरांनी केले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी विखेंवर हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथे पार पडलेल्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी उमेदवार आ. संग्राम जगताप, राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, भिमराव फुंदे, संभाजी पालवे, रोहिदास कर्डिले, देवराम गीते, भाऊसाहेब पोटे, संजय आवारे, महादेव गीते, अशोक ससाणे, म्हातारदेव ससाणे, भास्कर शिरसाठ, महापालिकेचे नगरसेवक गणेश भोसले, अशोक खोकराळे, किरण काळे, धनंजय गायकवाड, प्रकाश भागानगरे, भानुदास आव्हाड आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

शेती प्रधान असलेल्या आपल्या देशात आज शेतकरी , सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य  जनतेच्या भावनेची, त्यांच्या प्रश्नांची दखल घेणारे सरकार दिल्लीच्या सत्तेत असले पाहिजे. विरोधी उमेदवार कडून  आम्हाला विचारले जाते, तुम्ही काय केले? मात्र आम्ही विरोधकांना जाहीरपणे आव्हान करतो, आम्हाला विचारण्यापूर्वी तुम्ही कायम सत्तेत होतात, मंत्री आहात  तर ५० वर्षांत तुम्ही काय केले, याचा आधी हिशोब द्या, अशा शब्दांत आ. संग्राम जगताप यांनी  विरोधी उमेदवाराचा  नामोल्लेख टाळून त्यांच्या विधानाचा समाचार घेतला.

आ. जगताप म्हणाले, शेतमालाला हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, एक तर मुख्यमंत्र्यांनी या राज्यात स्वतंत्र क्रुषिमंत्री न नेमता एकाच मंत्र्याकडे या मोठ्या खात्याचा अतिरिक्त कारभार सोपवून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली.  दुसरीकडे, पंतप्रधान मोदींना भारतीय शेती, शेतकरी आणि त्यांचे प्रश्न यापैकी काहीच दिसत नाही. २ कोटी युवकांना रोजगार देतो असे म्हणाले. प्रत्यक्षात २० लोकांनाही रोजगार मिळाला की नाही, शंका आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ म्हणाले, त्याविषयी काही निर्णय घेतला नाही. कर्जमाफी आणि जनावरांच्या छावणीसाठी शेकडो अटी आणि शर्थी लादल्या. नोटबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करतांना शेकडो सामान्य लोकांना जीव गमवावा लागला. याउलट सन २०१४ साली आघाडी सरकारने ७० हजार कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी केली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ हजार वर्ग केले. अतिवृष्टीचे अनुदान वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनेची, त्यांच्या प्रश्नांची दखल घेणारे सरकार दिल्लीच्या सत्तेत असले पाहिजे. असे झाले तरच या देशातील १२५ करोड जनतेचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे राज्य येईल. शरद पवारांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे. शेतकऱ्यांचे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न  सोडवण्य साठीच स्थानिक व नेहमी उपलब्ध असणारा दक्षिणेच्या संग्रामाला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

 प्राजक्त तनपुरे म्हणाले, या सरकारने दुधाला भाव दिला नाही, साखरेच्या भावात अतिशय गोंधळ घातला. परिणामी साखर कारखानदार आर्थिक संकटात सापडले. आश्वासन देऊनही शेतमालाला हमीभाव दिला नाही. त्यामुळे या सरकारला या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या