पावणं, हे बरं नव्हं ; शरद पवारांकडून विखेंची खिल्ली


शेवगाव :
डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळून टीका करतांना पवार म्हणाले, 'सकाळी तिकीट मिळाले नाही म्हणून दुसरीकडे जायचं, हे धोरण चांगलं नाही. 'पावणं, हे बरं नव्हं!' असं मिश्किलपणे म्हणत पवारांनी डॉ. विखेंच्या भूमिकेची खिल्ली उडविली.

शेवगाव येथे झालेल्या सभेत कॉंग्रेसचे नेते व माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, हर्षदा काकडे, प्रताप ढाकणे यांनी आपले विचार मांडले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेवगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते. सत्ता परिवर्तन करण्याच्या या लढाईमध्ये आ. संग्राम जगताप यांच्या मागे शक्ती उभी करा, असे आवाहनही पवार यांनी केले.

प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आ. नरेंद्र घुले होते. यावेळी माजीमंत्री आ.बाळासाहेब थोरात, चंद्रकांत म्हस्के, माजी आ. पांडूरंग अभंग,जिलहध्यक्ष  राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हध्यक्ष करण ससाणे, आ. अरुण जगताप, संदीप वर्पे, प्रताप ढाकणे, घन:शाम शेलार, अविनाश आदिक, माजी आ. चंद्रशेखर घुले, संभाजी पालवे, बाळासाहेब जगताप, सचिन गुजर, सभापती क्षितिज घुले, संजय कोळगे, मन्सूर फारुकी, शारदा लगड, निर्मला मालपाणी आदींसह हजारो मतदार उपस्थित होते.

यावेळी आ. थोरात, माजी आ. अभंग, माजी आ. घुले आदींची भाषणे झाली. आ. जगताप यांनी या निवडणुकीनंतर जनतेच्या प्रश्नांवर पूर्णपणे लक्ष देण्याची ग्वाही यावेळी दिली. जनशक्तीच्या हर्षदा काकडे आणि शिवाजीराव काकडे यांनी आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा देत भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला

 ही निवडणूक पक्षापुरती मर्यादित नाही तर आपल्या प्रश्नांची, अस्तित्वाची, स्वाभिमानाची लढाई आहे अशा शब्दात उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी शेवगांवच्या जाहीर सभेत केले. माझ्या पाठीशी ताकद उभी केलात तर कुणाला घाबरण्याची गरज नाही. हा संग्राम तुमच्या पाठीशी सदैव उभा राहिल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक आपल्या नात्यागोत्याची नसून ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हिताची, शरद पवारांना ताकद देण्याची निवडणूक आहे. एकदा संधी दिली तर हा दक्षिणेचा संग्राम पाच वर्ष सेवेस तत्पर राहिल असे आश्वासन संग्राम जगताप यांनी दिले.

या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात  जो उमेदवार दिला आहे, ते आ. संग्राम जगताप हे मनमिळावू आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवण्यासाठी सक्षम आहेत. ते एक खणखणीत नाणं असून बंदा रुपया असल्याचे पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या