लोकसभा निवडणूक : शिर्डीतील १७४ मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग

loksabha%2B%25281%2529


नगर : प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिलला मतदान होत असून या निवडणुकीत लाइव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे.  मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, कायदा व सुव्यवस्थाअबाधित रहावी, या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.  शिर्डी लोकसभा मतदारसंघात १७४ मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.


निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणुक निरीक्षक विरेंद्रसिंग बंकावत, जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी  तथा निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे  यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहितेचे काटेकोर  पालन करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात १ हजार ७१० मतदान केंद्र आहेत. त्यापैकी १७४ मतदान केंद्रावर   लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यामध्ये अकोले ३१, संगमनेर २८, शिर्डी ३०, कोपरगाव २७, श्रीरामपूर ३१, नेवासा २७ अशा १७४ मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या