बूटफेक प्रकरण : नगरसेवकांचे पद रद्द करण्याबाबत आयुक्त पाठविणार प्रस्ताव

manpa%2Bkamgar%2Byuniyan

नगर : प्रतिनिधी मनपाचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांना झालेली शिविगाळ व बूट फेकून मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ अभियंत्यांसह सर्व कार्यालयीन कर्मचारीही बेमुदत सामुहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, अभियंते व युनियनच्या मागणीनुसार आंदोलनात सहभागी असलेल्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली.


बोल्हेगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामावरुन शिवसेनेने मनपात केलेल्या आंदोलनावेळी शहर अभियंता सोनटक्के यांना बूट फेकून मारण्यात आला. तसेच त्यांना शिवीगाळही करण्यात आली. या संदर्भात तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. मनपाच्या अभियंत्यांनी यापूर्वीच निवेदन देऊन सामुहिक रजेवर जात असल्याचे जाहीर केले होते. आता मनपाचे कर्मचारीही सामुहिक रजेवर गेले आहेत. नगरसेवकांचे पद रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांचा मनपाच्या कामकाजातील हस्तक्षेप थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युनियनने केली आहे. त्यानुसार नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या