विषयाला बगल देण्यासाठी शिवसेनेेचे आ.जगतापांवर आरोप : बाबासाहेब गाडळकर

IMG-20190428-WA0022

नगर : प्रतिनिधी बोल्हेगाव रस्त्याचे काम त्या भागातील शिवसेना नगरसेवकानेच बंद पाडले. आ.संग्राम जगताप यांनी हे काम सुचविले होते. मात्र, मनपात आंदोलन करुन अधिकार्‍यांना शिविगाळ, दमदाटी केल्याचा प्रकार अंगलट आल्यावर शिवसेनेने नेहमीप्रमाणे विषयाला बगल देण्यासाठी आ.जगताप यांच्यावर आरोप सुरू केले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.


शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसेनेवर पलटवार करतांनाच शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनाही लक्ष्य केले आहे. सातपुते यांनी शुध्दीत राहून आरोप करावेत, असा खोचक सल्लाही गाडळकर यांनी दिला आहे. बोल्हेगाव रस्त्याचे काम आ.जगताप यांनीच जिल्हाधिकारी व तत्कालीन महापौरांना सुचविले होते. शिवसेनेच्या तेथील नगरसेवकाने हे काम ‘भागीदारी’साठी बंद पाडले आहे. सातपुते यांनी संबंधित नगरसेवकाला आधी विचारावे व नंतर आरोप करावेत. शहरात कामे बंद पाडण्याची हातोटी कुणाला आहे, हे नगरकरांना माहिती आहे. शहरात जगतापांवर आरोप केल्याशिवाय आपले राजकारण होत नाही, असा टोला लगावत नगरकर या भूलथापांना बळी पडणार नाहीत, शिवसेनेच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही, असा दावा गाडळकर यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या