शिर्डी विमानतळावर स्पाइस जेटचे विमान धावपट्टीवरून घसरले


1556545572-SpiceJet_ANI

वेब न्यूज शिर्डी विमानतळावर स्पाइस जेटचे विमान धावपट्टीवरून घसरले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (दि.२९) सायंकाळी ही घटना घडली.


स्पाइस जेटचे एसजी ९४६ क्रमांकाचे विमान दिल्लीहून आले होते. शिर्डी विमानतळावर हे विमान उतरताच ही दुर्घटना घडली. विमान धावपट्टी सोडून पुढे गेले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सदर धावपट्टी काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या व शिर्डीतून जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रखडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या