उष्माघातामुळे जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू?

images

नगर : 
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून वाढत्या तापमानाने यंदा उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका बसून जिल्ह्यात यापूर्वी तिघांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातही आणखी तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे.


पारनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वीच एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यापाठोपाठ श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील चंद्रकांत राऊत यांचाही उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. सोमवारी दिवसभर उन्हात काम केल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. श्रीगोंदा येथे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रात्री त्यांचे निधन झाले. तसेच कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील बाळू नवले हे शेतातील काम आटोपून सायंकाळी छावणीवर जात असतांना अचानक भोवळ येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसर्‍या घटनेत राशीन येथील गणेश शिंदे यांचा अचानक ताप वाढल्याने मृत्यू झाला आहे. या दोघांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या