सरकारी ठेकेदार जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बसले उपोषणाला


अहमदनगर - गौण खनिज विकास निधी योजनेची कामे पुर्ण करुन देखील बीले मिळत नसल्याच्या निषेधार्थ सरकारी ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. ठेकेदारांचे कामापोटी अडकलेले कोट्यावधी रुपये मिळण्यासाठी पालकमंत्रींनी या प्रकरणात लक्ष घालून हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी जिल्ह्यातील ठेकेदार संघटनांनी केली आहे. 

उपोषणात रमेश तोडमल, अमित तोडमल, संदेश देशमुख, मोठा शंकर पठाडे, लक्ष्मण चव्हाण, सतीश वाघमारे, लखन पठाडे आदिंसह ठेकेदार सहभागी झाले होते. महसूल विभागाने जिल्ह्यामध्ये गौण खनिज विकासनिधी या योजनेमधून कामे ठेकेदारांमार्फत केली आहेत. सदर कामे पूर्ण झाली असून, झालेल्या सर्व कामाचा निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्याकडे शिल्लक आहे.

 मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे या योजनेत कामे करणार्‍या ठेकेदारांची देयके अदा न केल्यामुळे त्यांची लाखो रुपयाची बीले अडकल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेकेदारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी पत्राद्वारे दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या